Share

गैरसोय दूर होणार, अहमदनगर-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्र सरकारने तीन वर्षाअगोदर म्हणजे २०१८ च्या अर्थसंकल्पात अहमदनगर-औरंगाबाद १२० किमीच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. या फिल्ड सर्वेला तब्बल ३ वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे. १ मार्च ते ६ मार्च या कालावधीत रेल्वे फिल्ड सर्वेक्षण होणार आहे.

औरंगाबाद-नगर रेल्वेच्या मार्गासाठी २०१८ मध्ये तब्बल २१ लाख ७५ हजारांची तरतूद करण्यात आली होती. पण तीन वर्ष या सर्वेक्षणाला मुहूर्तच मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. तीन वर्षानंतर या कामाला ना आता कुठे जाऊन वेग मिळाला आहे. रेल्वेमार्गाच्या फिल्ड सर्व्हेसाठी ट्रॅफिक सर्व्हेची टीम १ मार्चला दाखल होणार आहे. हा सर्वे ४ दिवस चालणार असून हे पथक रस्तेमार्गाने गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, अहमदनगर येथील पाहणी करणार आहेत.

या भेटी दरम्यान औद्योगिक क्षेत्र, बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच ट्रान्सपोर्ट वाहतूकदारांकडून आढावा घेतला जाणार आहे. यावेळी प्रवासी संख्याचाही अभ्यास केला जाणार आहे. औरंगाबादकडून पुणे आणि अहमदनगरकडे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असतात. त्यामुळे हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या काळात ह्या कामाला वेग मिळेल का ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!