बीड : काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतिय कामगारांविरोधात आंदोलन पुकारले होते. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य असा त्यामागचा हेतू होता. शिवाय परप्रांतियांमुळे वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे वाढणारे प्रमाण या मुद्द्यांना देखील राज ठाकरेंनी हात घातला होता. त्यानंतर मनसेने मराठी भाषेला प्राधान्य देत अस्मितेचा अजेंडा राबवला. सध्या राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा प्रश्न समोर ठेवला आहे. मात्र, या दरम्यान स्थानिक पातळीवर काही पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्यांनूसार भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
मुबलक पाऊस होत नसल्याने जमिनीखालच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात विहीर किंवा बोअरवेल्स घेतल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून आलेल्या परप्रांतीय बोअरवेल्सवाल्यानी एकत्र येऊन संघटनात्मक बांधणी करून बोअरचे भाव पाच रुपये फुटाणे वाढवले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे .परंतु याचा फटका मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांना बसणार आहे. तेव्हा यांचा अतिरेक आम्ही चालू देणार नाहीत व अनधिकृत बोअर कोणत्याच परिस्तिथीत घेऊ दिले जाणार नाहीत असा इशारा मनसेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
दर वाढवले परंतु बोअर घेताना महसूल व परवानगी घेणे बंधनकारक आहे. दर वाढवले परंतु बोअर घेताना महसूल व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु हे सर्व बाजूला ठेऊन अतिरेकी पध्दतीने बोअर घेण्याच्या धंदा जोरात सुरू आहे. परप्रांतीय ठेकेदारांची नाटक आम्ही चालू देणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी सांगितले आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून याकडे दुर्लक्ष करू नये नसता गाठ मनसे सोबत आहे असा इशारा ही पत्रकाच्या शेवटी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
