मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात रविवारी तब्बल ५७ हजार ७४ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्यामुळे स्थिती ही अधिकच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.
काल मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून राज्य सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आज पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. #लढाकोरोनाशी #BreakTheChain pic.twitter.com/9E2Dn0f6lU
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 5, 2021
याबाबत, मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली.’ असं ट्विट मनसेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील होणार महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री !
- ‘आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांना पाहिले गेले, मात्र भाजपमुळे…
- एमआयएमच्या शाहनवाज खानसाठी खैरेंचा दबाव – सत्तारांचा गंभीर आरोप
- राज ठाकरेंचे भाकीत पुन्हा खरे ठरले, फटाक्याची माळ लागण्यास सुरवात झाली !
- शरद पवारांचा ‘पी.ए’ ते थेट महाराष्ट्राचा गृहमंत्री… दिलीपराव वळसे पाटील यांचा थक्क करणारा प्रवास !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

