मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. सामनातून याचा समाचार घेण्यात आला आहे.
दरम्यान, आज या मुद्द्यावरून या शिवसेनेने पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. राज्यपाल केवळ फाईलींवर बसून राहत आहेत का? असं सामनातून टीका करताना म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातून ही टीका झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. साधु-संतांच्या पदस्पर्शाने राजभवन पवित्र आहे आणि राज्यपाल हे कर्मयोगी ‘धर्म रक्षक’ आहेत त्यामुळे तिथे कोणत्याही यज्ञांची गरज नाही. मात्र वर्षा निवासस्थानाला नक्कीच भुताटकी ने पछाडले असावे म्हणुनच तर मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाहीत आणि तिथे रात्री झोपायलाही घाबरतात असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, राजभवनावर शांतीयज्ञाचे सल्ले देणाऱ्याने आधी वर्षावरच ‘हनुमान चालिसा पाठ’ करुन घ्यावा आणि साधु-संतांना बोलावून मुख्यमंत्र्यांची भीती काढून घ्यावी म्हणजे जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी त्यांना घराबाहेर पडता येईल आणि जाता जाता तरी लोककल्याणाचे निर्णय घेता येतील असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- खिलाडी कुमारचा ‘रामसेतु’चे चित्रीकरण पुन्हा होणार सुरु; गुफांचा मोठा सेट बनवण्यात आल्याची चर्चा
- ‘मोदीजी…इंधनदरवाढीच्या माध्यमातून सुरु असलेली जनतेची लूट आता तरी थांबवा’
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

