🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमीचा मुहूर्त साधत भारताच्या हवाई दलात राफेल लढाऊ विमान आज दाखल होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे फ्रान्समध्ये दाखल झाले असून राफेलचे शस्त्रपूजन केले आहे. त्यानंतर राफेलची चाचपणी करून राजनाथ सिंह त्या विमानातून उड्डाण घेणार आहेत.
राफेल हे जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. जागतिक क्रमवारीत राफेलचा चौथा क्रमांक लागतो. त्यामुळे भारताच्या हवाई दलात राफेल दाखल होणार असल्याने भारताची ताकद चांगलीचं वाढणार आहे. याबाबत राजनाथसिंह म्हणाले की, आज दसरा आणि हवाई दलाचा 87वा स्थापना दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भारताच्या हवाई दलात राफेल हे विमान दाखल होत आहे. तसेच मी फ्रान्सचा आभारी आहे. दिलेल्या वेळेतच राफेल विमानांची डिलीव्हरी होत आहे.
दरम्यान झाला होता. या सर्व विमानांची किंमत 7.87 अब्ज यूरो ठरविण्यात आली होती. यावरून देशात मोठा कलह निर्माण झाला होता. कॉंग्रेसने राफेल विमान प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. मात्र सर्व आरोप प्रत्यातून आता राफेल वायूदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557356955459585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557034396745731?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
