पुणे:- भारतीय जनता पक्ष बुडल्यास त्याला रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार असतील. दानवे कधी शेतकऱ्यांना साले म्हणतात, तर कधी वेगवेगळी वक्तव्ये करतात. रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ते बोलत होते. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या सहा बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्ये करतात. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करणं पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे, याचा विचार ते कधीच करत नाहीत. परंतु पक्षाचे अध्यक्ष अशा नेत्यांना पक्षात ठेवतात. पक्षात मोठी पदं देतात. त्यांना केंद्रीय मंत्रीपदं दिली जातात. पक्षाने आता अशा लोकांबाबत विचार करुन निर्णय घ्यायला हवा. अशा वाचाळवीरांनी आतापर्यंत अनेक पक्षसंघटना बुडवल्या आहेत, असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार; मुंबईत आक्रमक निदर्शने
- फेसबुक युझेर्स साठी महत्वाची बातमी: ‘या’ कारणामुळे फेसबुकला विकावं लागणार व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील…
- विराटच्या ‘पॅटरनिटी’ लीव्हला स्टिव्ह स्मिथचा पाठींबा
- शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी
- नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल : नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

