Share

हार्दिक पंड्यानंतर ‘हा’ मोठा खेळाडू रणजी ट्रॉफीतून बाहेर

Published On: 

मुंबई: हार्दिक पंड्याने काही दिवसांपूर्वीच रणजी ट्रॉफी सामन्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताचा अनुभवी विकेटकिपर बॅटर रिद्धिमान साहाने आगामी हंगामासाठी रणजी न खेळण्याच्या निर्णय घेतला आहे.तो बंगाल संघाकडून खेळत होता. मार्चमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतही त्याला स्थान मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे.

रिद्धिमान साहाचे रणजी न खेळण्यामागे श्रीलंका दौऱ्याचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बीसीसीआय मधील एका अधिकाऱ्याने खुलासा केला आहे. “रिद्धिमानला संघ व्यवस्थापनातील महत्वाच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना पुढे जायचे आहे आणि ऋषभ पंतसोबत काही नवीन बॅकअप तयार करायचे आहेत. त्याला समजावून सांगण्यात आले की त्याला श्रीलंका कसोटीसाठी निवडले जाणार नाही. संघात वरिष्ठ खेळाडूंना एक्स्पोजरचा वाटा द्यायला वेळ नाहीये. कदाचित हेच कारण असेल, रिद्धिमानने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अभिषेक दालमिया आणि सहसचिव स्नेहशीष गांगुली यांना ‘वैयक्तिक कारणांमुळे’ या मोसमात रणजी ट्रॉफी खेळणार नसल्याचे कळवले होते.”

महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर रिद्धिमान साहाने भारतीय संघाचे विकेटकिपर म्हणून बरेच काळ भुमीका पार पाडली. त्यानंतर रिषभ पंत याने साहाची जागा घेतली. साहाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलँडविरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेही कारण रिषभ पंतला त्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. साहा आता त्याच्या कारकिर्दीच्या अस्ताकडे आला आहे. त्यामुळे टीम ,मॅनेजमेंटला त्याच्यापासून पुढे जायचे आहे आणि त्यांनी ते राष्ट्रीय सेलेक्टर्सनाहीं कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!