Share

“लवकरच ईडी कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करणार”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

नवी दिल्ली: ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सीद्वारे तपास करण्याच्या नावाखाली राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warning about ED) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत लवकरच ईडी कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजपाचे नेते सतत मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं म्हणत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणारआहे. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. ईडीला कायदेशीरपणे ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कराव्यात. पण मीदेखील ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान ईडी आणि इतर यंत्रणा भाजप किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनल्या असून आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. त्यामुळे ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्व:तचे आर्थिक घोटाळे कसे आहेत त्यांचे वसुली एजंटयाबाबत पुराव्यानिशी माहिती सिद्ध करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!