नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला देशभरातून सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन आले असून महाराष्ट्र, बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं सुरु असल्याचे म्हणत राज्यात खळबळ माजवली आहे. तसेच याबाबत त्यांनी उपराष्ट्रपती(Vice President)व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिले आहे.
त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला निशाण्यावर धरले आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून त्यांची वेदना मी समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. हे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत. ईडी आणि इतर यंत्रणा भाजप किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. असा दावा करत आजचे पत्र हा ट्रेलर नसून ट्रेलर अजून यायचा आहे. असा इशारा (Sanjay Raut warning) संजय राऊत यांनी दिला आहे.
ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात आणि या सर्वांचे आर्थिक घोटाळे, मनी लॉण्ड्रिंग आणि यांचे वसुली एजंट याबाबत पुराव्यानिशी सिद्ध करणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणार आहे. मी ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश कऱणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान यामागील सूत्रधार कोण आहे? असा सवाल करत ईडी कार्यालयात भाजपाचे लोक बेकायदेशीरणे जाऊन बसतात. मी फडवणीसांना (Leader of Opposition Devendra Fadnavis) आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे. असे म्हणत आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईचा दादा शिवसेना आहे”; संजय राऊतांनी भाजपला सुनावले
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव


