मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून मोठी खळबळ माजवली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
भाजपने आता संजय राऊत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही, घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे अशा शब्दात भाजपा आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
अमित साटम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला म्हणून किरीट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे असा प्रकार संजय राऊतांनी सुरु केला आहे. त्यात प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे.
पुढे बोलताना अमित साटम यांनी संजय राऊत यांना आव्हान करत म्हणाले, तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पाहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे असा इशारा साटम यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही”, संजय राऊतांचा इशारा
“माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

