मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) टोला लगावला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना रावसाहेब दानवे म्हणाले की,‘अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही. पण वाईन आणि दारू मधला फरक अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही. उद्या ते असेही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील. मला असं वाटतं की याचं समर्थन कोणीही करू शकत नाही’, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, वाईन आणि दारू यात जमीन असमानाचा फरक आहे. वाईन ही फळांपासून बनत असते. अनेक वर्ष आपल्या राज्यातील शेतकरी अशा फळांची पिके घेतात. काजू, द्राक्ष यापासून वाईन तयार केली जाते. या फळांची पिके आपल्या राज्यातील शेतकरी घेत असतात. अशी अनेक प्रकारची फळे आहेत, ज्यापासून वाईन तयार केली जाते. मात्र काहींकडून जाणीवपूर्वक ‘मद्यराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे- देवेंद्र फडणवीस
“भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार”; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
पेगासस प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये…’
तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अॅमेझॉनची मदत घेणार- वर्षा गायकवाड
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत यांचा पुढाकार; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

