Share

‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर’, रावसाहेब दानवेंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

जालना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ईडी कडून करवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर महाविकास आघडीच्या नेत्यांकडून भाजपवर आरोप होत आहेत. ‘इडी आणि सीबीआय खंजीर आहे, महाविकास आघाडीच्या पाठीत खुपसण्यासाठी’ असा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसायला भाजप ची गरज नाही. जसे आमच्या काळात शिवसेनेने राजीनामे खिशात ठेवले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर आहेत, असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले आहे.

तिघांच्या खिशात असलेले खंजीर कधी एकमेकांना खुपसले जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आमच्या खंजीराची गरज नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला आहे. त्याच सोबत ते पुन्हा सारवासारव करत म्हणाले की, पवार कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत, राजकीय वैचारिक मतभेद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!