🕒 1 min read
नवी दिल्ली- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर उभे राहिले आहे.
पंजाबमध्ये सत्ता काँग्रेस सत्तेत असून, विरोधी बाकांवर शिरोमणी अकाली दल आणि भाजप आहे. तर आपनेही पंजाबमध्ये पावलं रोवण्यास सुरूवात केली आहे. तीन कृषी कायद्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी केली. तर काँग्रेसमध्ये गटबाजीला उत आला आहे.
काँग्रेसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू अशा दोन गटात संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे हा गृहसंघर्ष काँग्रेससाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.दरम्यान, पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असूनआता आगामी काळातील विधानसभा निवडणुकी अगोदर मंत्रिमडळात व कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.
याचबरोबर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांच्या जागी आता या पदासाठी नवज्योसिंग सिद्धू यांचं नाव चर्चेत अधिक चर्चेत आहे. नवज्योसिंग सिद्धू यांनी दिल्लीवारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांची देखील भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योसिंग सिद्धू यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्ष हिंदू असायला हवा असं म्हणत, या पदासाठी हायकमांडकडे विजय सिंगला यांच्या नाव पुढे केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून देखील आगामी काळात संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणेच बाकी आहे’
- डिजिटल पेमेंटसाठी Paytm देतेय ५० कोटींची ऑफर
- ‘ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येतात मग मराठा समाजाचे नेते का येत नाहीत?’
- पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला, ‘हे’ निर्बंध राहणार कायम; अजित पवारांच्या सूचना
- LICची नवी योजना; एकावेळी प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

