🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा रद्द झाली आहे. मूल्यमापन करून त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाअतर्गंत येणार्या शाळांपैकी ९३ टक्के शाळांनी दहावी विद्यार्थ्यांचे निकाल पाठवले असून उर्वरीत शाळांनी लवकर निकाल पाठवावेत, असे आवाहन औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी वर्गाची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदा दहावीचे १ लाख ८४ हजार हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. आता या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शासन निर्देशांनुसार शाळांकडून केले जात आहे. आजवर ९३ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करून औरंगाबाद विभागीय मंडळाकडे पाठवले आहे. उर्वरीत ७ टक्के शाळांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल पाठवावेत, असे आवाहन पुन्ने यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवऱ्याच्या उसण्या पैशांची विवाहितेकडे मागणी, न दिल्याने बेदम मारहाण
- पुन्हा नाका बंदी सुरु! तरीही चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या
- ‘ईडीला कोणीतरी सांगतंय, त्याचा काटा काढायचाय आणि मग…’; शेट्टींच्या विधानाने खळबळ !
- कोरोना सुरु झाल्यापासून औरंगाबादेत झाल्या ८ लाख चाचण्या!
- शिल्लेगाव पोलिसांनी आवळल्या कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

