Share

Sunil Raut। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवणार; सुनील राऊतांचा दावा

Published On: 

Sunil Raut। मुंबई : शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, ‘संजय राऊत यांचा भोंगा सुरू होता, म्हणूनच महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदेंना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच,’ अशा शब्दात त्यांनी टीका केली.

तसेच या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना उद्धव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार..आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा सुनिल राऊतांनी दिला. तर पुढे जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करतंय. हे सूडाचं राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे.

दरम्यान,  संजय राऊत यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला’, असे म्हटले होते. त्यावर सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ते म्हणाले की, ‘संजय राऊत यांचा भोंगा सुरू होता, म्हणूनच महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदेंना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच,’ अशा शब्दात त्यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!