Share

Congress । राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत घेऊन गेले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात सध्या महागाईचा प्रमाण वाढत चाललं आहे. याच महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दिल्लीत आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

यावेळी दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी दिलेली नसल्याने परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनात राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विनापरवानगी आंदोलन केल्याच्या आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं.

आज काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि त्यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर प्रियंका गांधी यांना अक्षरश:फरफटत पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतलाय. काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!