मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आज करण्यात आला आहे.
विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. अनेक गंभीर आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहेत.
विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत, असा खळबळजनक आरोप पीडितेनं केला आहे.वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचं पिडीतेने सांगितले आहे.
शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडितेने पत्रकार परिषदेत केला आहे.शरद पवार मला आपला मुलगाच मानतात त्यामुळे ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असं देखील या आरोपीने सांगितल्याचे पीडितेने सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी पीडितेसह पत्रकार परिषद घेऊन केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत, महिलांची अब्रू सुरक्षित नाही, जनतेला कोणी वाली नाही आणि खंडणीखोर सरकारला याकडे बघायला वेळ नाही. pic.twitter.com/mY7NAgFbvd
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 1, 2021
दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर संतप्त टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी पीडितेसह पत्रकार परिषद घेऊन केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत, महिलांची अब्रू सुरक्षित नाही, जनतेला कोणी वाली नाही आणि खंडणीखोर सरकारला याकडे बघायला वेळ नाही.’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्र्यांनाच जर जनतेच्या भावना समजत नसतील तर ते चूक करत आहेत; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
- ‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’
- महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा
- सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
- लॉकडाऊनबाबत तूर्तास निर्णय नाही, मात्र… राजेश टोपेंनी केलं सूचक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

