🕒 1 min read
मुंबई : नेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना देण्यात आला. ७ कोटी रुपये रक्कम पुरस्कार देण्यात आला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले गुरुजींच्या नावाची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.
युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. @ranjitdisale तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय. pic.twitter.com/RaeaHwXP4P
— Raj Thackeray (@RajThackeray) December 4, 2020
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा; राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार अरुण लाड यांचा टोला!
- आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार
- १०५ चे १५० होतील हा फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला – सचिन सावंत
- कंगनासाठी ओरडणारे फडणवीस शेतकऱ्यांविषयी गप्प का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
