🕒 1 min read
पुणे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हादरा दिला आहे. चंद्रकांत दादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला आहे.
चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण ते दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते, पण ज्या पदवीधरांच्या जीवावर ते निवडून गेले होते, त्यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने मला लोकांनी निवडून दिले. अशी प्रतिक्रिया अरुण लाड यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होतं, ते या निकालाने दाखवून दिलं’
‘गुन्हा सिद्ध झाला तरी लोकप्रितिनिधींवर आजीवन बंदी नाही’- सर्वोच्च न्यायालय…
‘हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत – शरद पवार
- मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत सिनेकलाकारांनी केला अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

