Share

कंगनासाठी ओरडणारे फडणवीस शेतकऱ्यांविषयी गप्प का ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे.केंद्र सरकारने लादलेले काळे कृषी कायदे मागे घ्या. या मागणीसाठी लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला कांग्रेससह महाराष्ट्रातील विवध पक्षांनी व विविध नेत्यांनी आपला पाठींबा दिला आहे.

दरम्यान, कंगना राणावत प्रकरण असेल,अर्णव गोस्वामी प्रकरण असेल,अशा इतरवेळी घसा फाडून फाडून ओरडणारे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का आहेत. असा सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केला आहे.

कपिल ढोके ह्यांनी ट्विटर वरून देवेंद्र फडणवीसांना हा सवाल विचारला आहे. महराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता आपला शत्रू ओळखला पाहिजे. ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही त्यांना ह्या पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी माफ करू नये अशी टीका या वेळी कपिल ढोके यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!