Share

१०५ चे १५० होतील हा फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला – सचिन सावंत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.आघाडीचा तब्बल ५० वर्षांनी महाविजय या मतदारसंघात झाला आहे.

दरम्यान, मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

इकडे पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला.एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली होती.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १०५ चे १५० होतील हा फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला. वर्षानुवर्षे ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही निसटला. ज्या मताधिक्याने काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी जिंकले त्यातून मोदी सरकारविरुद्धचा पदवीधरांचा राग दिसला ज्यांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले गेले. असा टोला सावंत यांनी फडणवीस यांना लगावला आहे. तर, विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्रात सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. हा काँग्रेस नेत्यांच्या एकोप्याचा विजय आहे. भाजपाचा परतीचा प्रवास आहे. अस देखील सावंत म्हणाले आहेत.

दुसरीकडे ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार महाआघाडीतील अंतर्गत विरोधातूनच कोसळेल. त्यावेळी भाजप एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल’, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्याला सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!