Share

‘चमकोगिरी’ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या; सुजित झावरेंचा निलेश लंकेंवर निशाणा!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले मात्र, पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करताना अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते.

असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला तुम्ही किती मदत करता हे महत्त्वाचे असल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे सुमारे एक कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी झावरे पुढे म्हणाले की, पारनेर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील संकटातून सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.

तालुक्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहिले तर सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळशी मंडल वगळता इतर ठिकाणीच्या कोणत्याही मंडलामध्ये पंचनामेच झाले नाहीत, तर मदत काय मिळणार? आमदारांनी अडचणीच्या काळात जनतेला मदत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही कोणाच्या विमानात बसता याचे जनतेला काही देणे-घेणे नसल्याची टीका करतानाच हे नव्याचे नवेपण असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी किरण कारखिले, सतीश गाडीलकर, जयसिंग बेंडाले, अंकुशराव कारखिले, दामोदर टकले, मंगेश कार्ले, ज्ञानदेव कारखिले, शशिभाऊ कारखिले, रवी कारखिले, संतोष डोमे, बलभिम कारखिले, मदन डोमे, भरत शेठ शितोळे, अतुल मोरे, निलेश शितोळे, राजेंद्र शितोळे, शिवाजीराव गाडीलकर, लक्ष्मण कारखिले, सोन्याबापू डोमे, पिंटू सरोदे, हनुमंत कारखिले, नरेश सोनवणे, पप्पू कार्ले, प्रसाद शितोळे, परसराम कारखिले, तुळशीराम गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!