🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ”मीही संघाच्या कार्यक्रमाला जाईल, त्यात गैर काय? असे स्पष्टीकरण देत नितेश राणेंच्या या संघबैठकीचं वडिल नारायण राणेंनी समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी राणे पिता पुत्राने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आला.
मात्र नुकताच सोशल मीडियावर नितेश यांचा संघाच्या कार्यक्रमातील एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते जमिनीवर बसलेले असून गणवेश नसल्यामुळे दुसऱ्या रांगेत बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या संघ कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी नितेश यांना ट्रोल करायला सुरुवात केली. यावर मुलाच्या संघाच्या कार्यक्रमच कौतुक केल आहे. ते म्हणाले. ‘संघाच्या कार्यक्रमाला जाणं चुकीचं नाही, मीही संघात जाईन, संघाच्या प्रमुखांना भेटेन. जायचंच तर मनापासून जायचं. माझी विचारधारा ही हिंदुत्ववादीच आहे. काँग्रेसमध्ये जाणं हा माझा नाईलाज होता, भारतीय जनता पक्षाची विचारधारा मी मान्य केली आहे आणि संघाची विचारधाराही मी मान्य करतो.
दरम्यान, कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि उमेदवार सतीश यांनी त्यांची मनधरणी केली. तसेच पारकर यांना शिवसेनेत मोठ्या पदावर संधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेवटी पारकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता कणकवलीत नारायणे राणे विरुद्ध सतीश सावंत असाच सामना रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835275275649034?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
