Share

रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय

Published On: 

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघावर सर्व स्तरातुन टिका होत आहे. या टिकेच्या केंद्रस्थानी भारतीय फलंदाजी आहे.

या सामन्यातील अपयशानंतर माजी भारतीय क्रिकेटपटु आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अंजिक्य रहाणेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’अंजिक्य रहाणेने अनेकदा कर्णधार म्हणून परदेशात भारताला विजय मिळवून दिला. मात्र फलंदाज म्हणून त्याची फंलदाजी म्हणावी तशी बहरली नाही. ही गोष्ट अंजिक्य स्वत: नाकारु शकत नाही. भविष्यात तो नक्की फलंदाज म्हणून कामगीरी सुधारेल.’ अशी अपेक्षा बांगर यांनी व्यक्त केली.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी रहाणेला पर्याय म्हणून करुण नायर आणि हनुमा विहारीचे नाव पुढे केले. एक दोन सामन्यातील अपयशानंतर नायरला संघाबाहेर केल्यामुळे बांगर यांनी नाराजी दर्शवली. डब्ल्युटीसी सामना गमावल्यानंतर मधल्याफळीत हनुमा विहारीचे पुनरागमन होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!