🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारे योगगुरू रामदेव बाबा लोकसंख्येबाबत भाष्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
नेमकं काय म्हणाले रामदेवबाबा ?
कोणत्याही परिस्थितीत भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या पुढे जाता कामा नये. अन्यथा परिस्थिती अवघड होईल.त्यामुळे सरकरने यासाठी कायदाच केला पाहिजे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या नागरिकांचा मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा हक्क काढून घेतला पाहिजे. तसेच त्यांना सरकारी रुग्णालये व शाळा अशा सुविधांचा लाभ देणेही थांबवले पाहिजे, असे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
