🕒 1 min read
दापोली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले नेमकं रामदास कदम ?
मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?, असा खोचक सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला.त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलत होते.
पुढे रामदास कदम बोलताना म्हणाले की, आम्ही कधी नाही म्हटलं आहे का उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,असे अनेक सवाल कदमांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे.
परंतू रश्मी ठाकरे सगळीकडे दिसतात-
तसेच, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत. परंतू आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच, असं कदम यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Elaichi Water Benefits | तुम्ही कधी इलायची चे पाणी प्यायला आहात का? कारण त्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,जाणून घ्या!
- Diet In Dengue | डेंग्यू मधुन लवकर रिकवर होण्यासाठी आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी फॉलो करा.. जाणून घ्या!
- Cars Comparison | एकाच प्लॅटफॉर्मवर असूनही टोयोटा हायरायडर मारुती ग्रँड विटार किती वेगळ्या आहेत.. जाणून घ्या!
- Narayan Rane । उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा; नारायण राणेंचा सल्ला
- Marathi Moive | कुठे गेला मराठी प्रेक्षक? जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केला संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
