Share

Diet In Dengue | डेंग्यू मधुन लवकर रिकवर होण्यासाठी आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी फॉलो करा.. जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

पावसानंतर डेंग्यू चा प्रसार डासांच्या माध्यमातून झपाट्याने होतो. देशभरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. हा फ्लूसारखा आजार आहे, जो एडिस डासामुळे पसरतो. डेंग्यूत योग्य उपचार न केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होणे कधीकधी प्राणघातक ठरते. डेंग्यूच्या सुरुवातीला रुग्णाला चांगली आरोग्य सेवा मिळाल्यास तो लवकर बरा होऊ शकतो.योग्य आहार देखील त्याला लवकर रिकवर व्हायला मदत करतो. जर तुम्ही डेंग्यूपासून बरे होत असाल तर शरीरात खूप अशक्तपणा येतो. यासाठी खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. आज आम्‍ही तुम्‍हाला असा डाएट सांगत आहोत जे तुम्‍हाला डेंग्यूपासून बरे होण्‍यास मदत करेल.

डेंग्यू पासून बरे होण्‍यास मदत करणाऱ्या गोष्टी 

१ भरपूर पाणी प्या

डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. चांगल्या प्रमाणात द्रव आहार घेतल्याने पुनर्प्राप्ती गतिमान होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी ताज्या फळांचा रस, भाज्यांचे सूप, नारळ पाणी, डाळिंबाचा रस आणि अननसाचा रस प्या. डेंग्यूमुळे आलेला विकनेस दूर करण्यासाठी रिहायड्रेशन खूप मदत करते.

२ हिरव्या पालेभाज्या खा

डेंग्यूच्या तापात हिरव्या पालेभाज्या जास्त खाव्यात. जर तुम्हाला भाजीची चव आवडत नसेल तर तुम्ही सूप बनवून पिऊ शकता. याशिवाय भाज्या सलाडच्या स्वरूपातही खाता येतात. यामुळे जलद पुनर्प्राप्ती होईल आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे देखील मिळू शकतील.

3 आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यात आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. डेंग्यूमुळे रुग्णाला भूक कमी लागते. या स्थितीत पचनसंस्था मंदावते. त्यामुळे पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या. रुग्णाला भाजीची खिचडी, दलिया आणि मसूर खायला द्या. अन्नाला चव आणण्यासाठी धणे, लसूण, आले आणि लिंबू यांसारख्या गोष्टींचा वापर करा.

4 बाहेरचे अन्न टाळा

जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर तुम्ही बाहेरचे अन्न टाळावे. डेंग्यूमध्ये पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स किंवा इतर कोणतेही बाहेरचे अन्न खाऊ नये. तसेच बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड वस्तू टाळा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!