Share

Ramdas Kadam | “नरेंद्र मोदींना बोलून प्रकल्प परत आणू शकतो का?” ; रामदास कदमांचा चर्चा करण्याचा सल्ला

Published On: 

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरून त्यांच्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला असल्याचं म्हटलं जातं आहे. यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

रामदास कदम काय म्हणाले-

शिंदे भाजप सरकार काल आलं आहे, अजून शिंदे – फडणवीस सरकारची हळद देखील उतरली नसून एखादा प्रोजेक्ट जर राज्यातून बाहेर गेला असेल, तर त्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार कसे कारणीभूत असू शकेल, असा सवाल करत रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

हा प्रकल्प आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून आणू शकतो का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत सखोल चौकशी करावी, आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. आपण कुठे कमी पडलो, पुन्हा हा प्रकल्प आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून आणू शकतो का? या विषयावरही आपण चर्चा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

दरम्यान, गुजरात हे सेमीकंडक्शन धोरण असलेलं एकमेव राज्य आहे. त्यामुळे या कंपनीने गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे. याच एका कारणामुळे महाराष्ट्राच्या हातून हा प्रोजेक्ट गेला असल्याचं म्हटलं जात आहे. गुजरातने सेमी कंडक्शन धोरण बनवलं, असं धोरण बनवणारं देशातील हे एकमेव राज्य असून या धोरणा अंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रॉनिक मिशन स्थापन करण्यात आलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या मान्यता बजेटमध्ये घेतल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!