अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर नवनीत राणा यांनी आरती सिंग यांच्यावर वर्दीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर आपण त्यांना घाबरत नसल्याचं देखील राणांनी म्हटलं होतं. यावर आता पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आरती सिंग यांचं स्पष्टीकरणः
अमरावती शहरात आरोप करणारं फक्त एकच दाम्पत्य आहे, ते म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, मला इथे येऊन २ वर्षं झाली. पण आत्तापर्यंत माझ्यावर कोणत्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे आरोप केले नसल्याचं आरती सिंग यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा गुन्हा दाखल केल्यापासून आरोप करत आहेत, यापुर्वी…
शाईफेकप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांनी आरोप सुरू केले आहेत, असा दावा आरती सिंग यांनी केला आहे. पालिका आयुक्तांवर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणं सुरू केलं आहे, याआधी त्यांनी कधीही आरोप केले नाहीत, यावरून आपण त्याचा अर्थ समजू शकतो, असं आरती सिंग म्हणाल्या.
यादरम्यान, आताही त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, या आरोपांनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंटवरून आपण ते समजू शकतो, लोक स्वत: त्यांना उत्तर देत आहे, असंही आरती सिंग यांनी नमूद केलं.
दरम्यान, आरती सिंग यांच्या या भूमिकेवर बोलताना नवनीत राणांनी आपण अशा कारवायांना घाबरत नाही, असं म्हटलं आहे. माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत, त्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे, असा आरोप नवनीत राणांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde | “एकनाथ शिंदेंना CM बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली”
- Bacchu Kadu | बच्चू कडू अडचणीत! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- Xiaomi MIJIA Smart Pillow | Xiaomi चा हा स्मार्ट पिलो झोपेला ट्रॅक करतो , त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या..
- Chaulai Benefits | राजगिराच्या भाजीने मधुमेह, हाय कोलेस्ट्राॅल सारखे अनेक आजार होतील गायब, जाणून घ्या
- Narendra Modi | वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातुन गुजरातला गेल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

