Share

बाइक प्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ बाईकवर आहे 4 लाखांची सूट ..

Published On: 

जी कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रथम अपयशी ठरली. ती कंपनी आज अमेरिकन हार्ले-डेविडसन पैन अमेरिका 1250 स्टैंडर्ड बाइक Rs 4 लाख स्वस्तात विकत आहे. या कंपनीने सर्व कंपन्यांना हैराण केले आहे. या बाईकच्या ऑफरबद्दल जाणून घेऊया खाली बतमीमध्ये ..

अमेरिकन मोटारसायकल कंपनी हार्ले डेव्हिडसनने भारतीय बाजारपेठेतून कधीच गेली आहे . मात्र, ज्यांना ही बाईक आवडते ते अजूनही ती खरेदी करू शकतात. कंपनी भारतात या बाइकची डिलिव्हरी देत ​​आहे. दरम्यान, ही बाईक खरेदी करण्याची एक उत्तम संधीही चालून आली आहे. वास्तविक,हार्ले डेव्हिडसनने ने त्यांच्या एकमेव ADV बाईक पैन अमेरिका 1250 (Pan America 1250) च्या किमतीत मोठी कपात केली आहे. ही बाईक आता 4 लाख रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. ही हार्ले डेविडसन बाईक दोन प्रकारात येते.

हार्ले डेव्हिडसन बाइक ची  किंमत आणि ऑफर

हार्ले-डेविडसन पैन अमेरिका 1250 स्टैंडर्ड (Harley Davidson Pan America Bikes) आता 12.91 लाख रुपयांना उपलब्ध आहे. यापूर्वी त्याची किंमत 16.90 लाख रुपये होती. त्याच वेळी, पॅन अमेरिका 1250 स्पेशलची किंमत कपात केल्यानंतर 17.11 लाख रुपयांवर गेली आहे. यापूर्वी त्याची किंमत 21.11 लाख रुपये होती. ही 2021 मॉडेल्स आहेत ज्यात फक्त मर्यादित युनिट्स शिल्लक आहेत. कंपनीला या मोठ्या सवलतीसह भारतीय बाजारपेठेत या बाइकचे आणखी युनिट्स विकायचे आहेत.

या बाइकमध्ये 1252cc V-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक वाहनांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. इंजिन 150.19 bhp पॉवर आणि 128 Nm टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात 21.2 लीटरची इंधन टाकी आहे.

हार्ले-डेविडसन ने पैन अमेरिका 1250 स्पेशलला अडेप्टिव लाइट्स, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम, अडॅप्टिव्ह राइडची उंची (पर्यायी), स्पोक व्हील आणि सेमी-एक्टिव्ह सस्पेन्शन यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज केले आहे. बाइकचे वजन 258 किलो आहे. बाईकच्या पुढील आणि मागील दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!