नवी दिल्ली : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचे वडील जेड स्टोक्स यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून जेड ब्रेन कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. मुळचे न्यूझीलंडचे असलेले जेड स्टोक्स हे उत्कृष्ट रग्बीपटू आणि प्रशिक्षक होते.
काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत राहता यावं यासाठी बेन स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातून माघार घेत न्यूझीलंडला आपल्या परिवारासोबत राहणं पसंत केलं होतं.एक वर्षापूर्वी, जेव्हा बेन डिसेंबरमध्ये एक कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला होता तेव्हा त्याच्या वडिलांना मेंदूत कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.
RIP Ged Stokes. One of the greatest characters in our special cricket family.
We're with you Ben. Strength to you and your family ???????? pic.twitter.com/jA2EA0DVIk
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 8, 2020
दरम्यान, यंदा हंगामात राजस्थान रॉयल्सकडून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग खेळण्यासाठीही स्टोक्स उशीरा दाखल झाला होता. यावेळी त्याने आपल्यासाठी कुटुंब अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले’; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार : शंभूराज देसाई
- आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू : मुश्रीफ
- गुरुजींच्या संघर्षाला यश, राज्यात लवकरच 6 हजार शिक्षकांची भरती !


