मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्र पोरकं झालं आहे.
लता मंगेशकर यांनी असंख्य गाणे गायली (Lata Mangeshkar Songs) आहेत. विविध भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. तसेच सर्वात जास्त रेकॉर्डिंग करण्याचा विश्वविक्रम देखील त्यांनी केला असून त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बूकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांचा होता आवाजाने सुंदर गळा
त्या होत्या तुमच्या देशाच्या प्रसिद्ध गानकोकिळा
त्यांचा होता सर्व रसिकांना लळा
त्यांनी फुलविला होता गाण्यांचा मळालतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती
दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती
गरिबांच्या दुःखावर मायेची
फुंकर होती— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 6, 2022
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी खास त्यांच्या कवितेतून भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास आठवले म्हणाले, त्यांचा होता आवाजाने सुंदर गळा, त्या होत्या तुमच्या देशाच्या प्रसिद्ध गानकोकिळा, त्यांचा होता सर्व रसिकांना लळा, त्यांनी फुलविला होता गाण्यांचा मळा, लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती, दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती, गरिबांच्या दुःखावर मायेची फुंकर होती.., अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या:
‘रसिकांची मैफिल सुनी करून दीदी गेली’; मनीषा कायंदे यांनी व्यक्त केल्या भावना
बाळासाहेबांनंतर लतादीदी आमच्या आधार होत्या, रश्मी ठाकरे भावुक!
काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला-चित्रा वाघ
पू.ल. देशपांडे लतादीदींबद्दल एकदा म्हणाले होते, ‘या आकशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि…’
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


