Share

काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला-चित्रा वाघ

Published On: 

मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर ‘काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला’ अशा शोकभावना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या शोकभावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला. लता नावाचा स्वर्गीय आवाज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय. अनेक पिढ्या येतील, जातील पण लतादीदी कायम अजरामर राहतील. एक सूर्य, एक चंद्र, एक लता मंगेशकर! आज खऱ्या अर्थाने सूर मूक झालेत.. भावपूर्ण श्रद्धांजली…’ असे चित्रा वाघ आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या आहेत.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लता दीदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लता मंगेशकर यांचं मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात आज सकाळी ८.१२ वाजता निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं लता दीदींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!