मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्र पोरकं झालं आहे.
लता मंगेशकर यांनी असंख्य गाणे गायली (Lata Mangeshkar Songs) आहेत. विविध भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. तसेच सर्वात जास्त रेकॉर्डिंग करण्याचा विश्वविक्रम देखील त्यांनी केला असून त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बूकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांच्या बद्दल पू. ल. देशपांडे (P.L. Deshpande) एका भाषणात बोलतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पू. ल. देशपांडे एकदा भाषण करत असताना म्हणाले होते, की जर मला कोणी विचारलं आकाशात देव आहे का, तर मी त्यांना सांगेल, मला माहिती नाही. मला माहिती एकच की या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे, असं त्यावेळी पू. ल. देशपांडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले-नाना पटोले
‘असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला’ : सुधीर मुनगंटीवार
लता दीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
हॉलीवूडमध्ये दिसली होती लतादीदींच्या गाण्याची झलक; ‘या’ चित्रपटात वाजली होती गाणी
Lata Mangeshkar Biography: ‘नाचू या गडे…’ या मराठी गाण्याने झाली लता मंगेशकरांच्या करिअरला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

