मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्र पोरकं झालं आहे.
लता मंगेशकर यांनी असंख्य गाणे गायली (Lata Mangeshkar Songs) आहेत. विविध भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. तसेच सर्वात जास्त रेकॉर्डिंग करण्याचा विश्वविक्रम देखील त्यांनी केला असून त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बूकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
28 दिवसांच्या संघर्षाला पूर्णविराम! रसिकांची मैफिल सुनी करून दीदी गेली. ती केवळ भारताची गानकोकिळा नव्हती, भौगोलिक सीमा पार करून तिच्या स्वरांनी जगाला मोहिनी घातली होती. आजच्या 'युथ'पासून 80 पार केलेल्या 'तरुणांनी' ज्यावर प्रेम केले तो स्वर आज हरपला.
भावपूर्ण श्रद्धांजली!???? pic.twitter.com/TgzMlqRpGh
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) February 6, 2022
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनीषा कायंदे म्हणाल्या, २८ दिवसांच्या संघर्षाला पूर्णविराम! रसिकांची मैफिल सुनी करून दीदी गेली. ती केवळ भारताची गानकोकिळा नव्हती, भौगोलिक सीमा पार करून तिच्या स्वरांनी जगाला मोहिनी घातली होती. आजच्या ‘युथ’पासून ८० पार केलेल्या ‘तरुणांनी’ ज्यावर प्रेम केले तो स्वर आज हरपला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या:
काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला-चित्रा वाघ
पू.ल. देशपांडे लतादीदींबद्दल एकदा म्हणाले होते, ‘या आकशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि…’
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले-नाना पटोले
‘असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला’ : सुधीर मुनगंटीवार


