Share

‘आर्यनला अद्दल घडलीये, त्याला आम्ही ड्रग्ज मुक्त करू’, रामदास आठवलेंचे शाहरूख खानला आवाहन

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीतून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. सुरुवातीला आर्यन एनसीबीच्या आणि त्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत आहे. ‘मन्नत’मध्ये आलिशान आयुष्य जगणाऱ्या आर्यनला क्रुझवरील सफारी चांगलीच महागात पडली आहे.

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान जवळपास गेल्या १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

या प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शाहरूख खानला एक आवाहन केले आहे. माध्यमांनी संवाद साधताना आठवले म्हणाले की, ‘आर्यन खान लहान आहे, पण शाहरुख खान कलाकार म्हणून महान आहे. आर्यनला आता सबक शिकलेला आहे. आर्यनला ड्रग्स मुक्त करा, असं आवाहन मी शाहरुख खानला करतो. आमच्या मंत्रालायत ड्रग्स मुक्ती केंद्र आहे. आम्ही दोन ते तीन महिन्यात आर्यनला ड्रग्ज मुक्त करू’, असे आश्वासनही त्यांनी दिलेय.

दरम्यान, आर्यन खान याच्या व्हॉट्सअप संवादात अभिनेत्री अनन्या पांडे हीच नाव उघडकीस आलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्ज बाबत चर्चा झाली होती. दोघांमध्ये ड्रग्ज मागवण्याबाबत चर्चा झाली होती. याचमुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची सुमारे सात तास चौकशी झाली आहे. यावेळी या संभाषणाबाबत चौकशी झाली. याच संभाषणामुळे आर्यन याला जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एनसीबी अधिकारी आता आर्यन खान, अनन्या पांडे यांच्या ड्रग्ज अँगलने तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!