🕒 1 min read
सोलापूर: आज दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. कोविडच्या काळातही राज्याने चांगले काम केले ज्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. तरिही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलत असताना महाराष्ट्राने इतर राज्यात कोरोना पसरवला, असे सांगितले. मोघलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे केंद्र सरकारला महाराष्ट्र दिसतो. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य मदत दिली जात नाही, सहकार्य केले जात नाही. उलट महाविकास आघाडी सरकार कसे पडेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेच्या पर्वात बोलत होते.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजन पाटील यांचे भरभरून कौतुक केले. “पक्षाला अहोटी लागली असताना साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. जेव्हा आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली होती, तेव्हा कुणीही सभा घेत नव्हते. त्यावेळी राजन पाटील यांनी सभा घेतली. बरेच लोक इकडच्या तिकडे झाले. पण राजन पाटील आणि त्यांचे सहकारी पवार साहेबांसोबतच राहिले. म्हणून कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी राजन पाटील यांचं महत्त्व कमी होणार नाही”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कौतुक केले.
https://www.facebook.com/313596615444842/posts/2276392135831937/?sfnsn=wiwspmo
जयंत पाटील पुढे म्हणाल की, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी परिस्थिती विचित्र होती. लोक पक्ष सोडून जात होते. राष्ट्रवादीचा निकाल चांगला लागणार नाही, असे भाकीत माध्यमे व्यक्त करत होते. तेव्हा पवार साहेबांनी संपुर्ण राज्याचा झंझावाती दौरा केला आणि लोकांनी साहेबांच्या प्रत्येक सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोलापूरातही भव्य सभा घेण्यात आली आणि लोकांनी पवार साहेबांसह आम्हा सर्वांना साथ दिली. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, असे सतत बोलले जात होते. मात्र पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले.”
यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहनही केले. ते म्हणले की, “आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये ताकदीने लढा आणि चांगले यश मिळवा. या भागातील शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचे काम करू. तसेच इतरही योजना पूर्ण केल्या जातील. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करा.”
महत्वाच्या बातम्या:
- “दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान”, रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
- “तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब”, खडसेंचा गुलाबरावांवर पलटवार
- बीसीसीआयला पत्रकाराचे नाव सांगणार नाही साहा; कारण देत म्हणाला…
- वर्ल्ड कप आधीच भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
- दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक दावा; म्हणाले,”सचिन वाझेंच्या मर्सिडीजमधून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
