अयोध्या : अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर श्री राम जन्मभूमीवर राम मंदिराचे काम सुरू झाले आहे. त्या नंतरची पहिलीच रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. मात्र, कारोनामुळे या वर्षी रामनवमी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. या उत्सवात केवळ मंदिराचे मुख्य पुजारी आणि आणि सहकाऱ्यांनाच सहभागी होता येईल. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘कोरोना महामारीचा वाढता प्रभाव पाहता न्यासच्या वतीने श्रीरामनवमीचा जन्मोत्सव परंपरागत पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जाईल. सर्व भक्तांना प्रवेशास बंदी असेल. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेले कोरोना संबंधीत नियमांचे सर्वांनी पालन करावे. घरीच पूजा-पाठ, उपवास करावेत. आपण निरोगी राहिल्यास आपला परिवार देखील सुरक्षीत राहील आणि भविष्यात रामनवमी उत्सव साजरा करू. जन्मोत्सवानिमित्त आम्ही सर्वांच्या आरोग्यासाठी प्राथना करतो.’
कोरोना महामारी के बढ़ते प्रभावों को ध्यान में रखते हुए न्यास द्वारा यह निर्णय लिया गया है कि श्रीरामनवमी के दिन श्रीराम जन्मभूमि परिसर में प्रभु श्री रामलला जी का जन्मोत्सव परंपरागत रूप में मुख्य पुजारी जी के मार्गदर्शन में मनाया जाएगा, परंतु सभी भक्तों का प्रवेश वर्जित रहेगा।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) April 19, 2021
राम जन्मभूमीवर मंदिर निर्मितीचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागल्यानंतर ही पहिलीच रामनवमी या ठिकाणी साजरी होणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे यंदाही या ठिकाणी भक्तांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भक्तांची निराशा झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रेमडेसिवरबाबत खोडसाळपणे केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ मलिकांनी एकही पुरावा आतापर्यंत दिलेला नाही’
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- मनुष्यबळाची कारणे सांगितल्यास पोलीस निरीक्षकांची कंट्रोलला बदली ?
- परभणी जिल्हा रुग्णालयातील कोरोनायोद्धे तीन महिन्यांच्या वेतनासाठी गेले संपावर
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे बालीश राजकारण आता थांबवावे’


