🕒 1 min read
मुंबई : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.
ब्रुक फार्माच्या मालकावरील कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. त्यासाठीच भाजपवर आरोप केले जात आहेत, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. ‘राज्यातील जनतेसाठी ५० हजार रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे, असे आवाहन लाड यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी,’ असे देखील यावेळी लाड म्हणाले आहेत.
दरम्यान, देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा सर्व परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे सुरु असलेले राजकारण सर्वसामन्यांना सध्या त्रासदायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘असे’ तळीराम पाळायची सवय फडणवीसांना, संजय गायकवाडांचे जोरदार प्रत्युत्तर
- महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे – अमित शहा
- औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट नाहीच! परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मनपा आयुक्तांचा दावा
- विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय-बावनकुळे
- तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे! अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

