Share

परभणी जिल्हा रुग्णालयातील कोरोनायोद्धे तीन महिन्यांच्या वेतनासाठी गेले संपावर

Published On: 

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून अहोरात्र परिश्रम करत आहेत. तर आरटीपीसीआर टेस्टच्या चाचण्या करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रयोगशाळेतील कोरोना योद्धांना सरकारी लालफितीच्या कारभारामुळे तीन – तीन महिन्यांपासून वेतन मिळत नाहीत. शेवटी हे वेतनासाठी सोमवारी दुपारपासून संपावर गेले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच आरटीपीसीआर टेस्टच्या चाचण्या करणाऱ्या या जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रयोगशाळेतील कोरोनायोद्धांना सरकारी लालफितीच्या कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रयोगशाळेत तंत्रज्ञांसह अंदाजे संपावर 20 कर्मचारी आहेत. बहुतांश कर्मचारी हे कंत्राटी आहेत. वर्षभरापासून ते इमानदारीने अहोरात्र परिश्रम करीत आहेत. दररोज सर्वसाधारणपणे दीड ते दोन हजार आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल हे 24 तासांमध्ये देण्याचे प्रयत्न करत आहेत.

क्षमतेपेक्षा जास्त, तसेच निष्ठेने काम करणाऱ्या या कोरोना योद्धांना सरकारी पातळीवरील लालफिती कारभाराने जानेवारी महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. आज ना उद्या वेतन मिळेल, त्यात नियमितता राहील, अशी अपेक्षा बाळगून हे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. परंतू सरकारी पातळीवरील अधिकाऱ्यांना या कोरोनायोद्धांच्या योगदानाविषयी काडीचेही देणे घेणे नसल्याचा आरोप देखील या वेळी संपकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!