औरंगाबाद : ब्रेक द चेनची अंबलबजावणी कशी होते, हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पाहणी केली असता, त्यांना नाका बंदीवर दिलेल्या मनुष्यबळापेक्षा कमी लोक दिसले. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस निरीक्षकांना मनुष्यबळा संदर्भात कोणी चुकीची माहिती दिली तर त्या पोलिस ठाणे प्रभारीची बदली कंट्रोलला होणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.
शहरात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून विनाकारण फिरणाऱ्या लोकांसाठी शहर पोलीस दलाकडून तब्बल ६० ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाका बंदी ठिकाणी किमान आठ ते दहा कर्मचारी कारवाई करत आहे. त्यासाठी रविवारी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दलाला शब्स्की देखील दिली.
मात्र, आज त्यांनी अचानक नाका बंदी ठिकाणची पाहणी केली असता, त्याठिकाणी पूर्ण क्षमतेने कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याबद्दलची विचारणा त्यांनी केल्यावर मनुष्यबळ हा विषय त्यांच्या निदर्शनास आला. त्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कर्मचारी लावण्याची गरज पडल्यास ते हि करण्याच्या सुचना दिल्या.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पोलीस ठाण्यातील जास्तीत जास्त कर्मचारी नाका बंदीच्या ठिकाणी लावण्याच्या सुचना दिल्या. कोणत्याही ठाणे प्रभारींनी पुन्हा मनुष्यबळाचा विषय आणल्यास त्या अधिकाऱ्याची बदली कंट्रोलला करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’


