मुंबई – खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला असा आरोप पाटील यांनी केलं आहे .
राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले आहे. कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट नाहीच! परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मनपा आयुक्तांचा दावा
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे बालीश राजकारण आता थांबवावे’
- महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार
- लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

