Share

‘राम का काम होगा’, मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रलंबित राम मंदिर पूर्णत्वास जाण्याची अशा वाटत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर मधील रामकथा कार्यक्रमात त्याबाबत संकेत दिले आहेत. रामाचं कार्य सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि ते होणारच, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.

संघ परिवाराकडून राम मंदिराचं बांधकाम सुरु करावे अशी मागणी करत निवडणुकीपूर्वी देशभरात हुंकार सभा घेतल्या होत्या. तसेच केंद्र सरकारने राम मंदिराबाबत अध्यादेश काढावा, असा आग्रह भागवतांनी केला होता. आता निवडणुका झाल्यानंतर संघाने पुन्हा एकदा राम मंदिराबाबत जोर पकडल्याचे दिसत आहे.

दरम्यान भाजपने 2019 च्या जाहीरनाम्यातही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून केंद्र सरकार राम मंदिर निर्माणासाठी आवश्यक असणारे निर्णय घेईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे या पंचवार्षिक मध्ये मोदी सरकार रखडलेल्या राम मंदिराचा प्रश्न पूर्णत्वास नेणार का याकडे देशातील जनतेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील लक्ष आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!