🕒 1 min read
मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. शनिवारी, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.
अर्णबच्या जामीनावरून काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज देखील अन्वय नाईक प्रकरणातील तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हे प्रकरण न्यायालयीन कोठडीचं असून उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे त्या अलिबाग सत्र न्यायालयात यावर पुन्हा याचिका करावी असं कोर्टाने सांगितलं आहे. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, आता अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांचा पुढाकार कायम आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासाठी मागील आठवड्यात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, त्याचसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती.
आज आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी जाणार असून त्याठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेणार आहेत. अर्णब गोस्वामी यांची सुटका करा आणि अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी राम कदम गृहमंत्र्यांना करणार आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आलेले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे.
घर से निकला हु ! हुतात्मा चौक जाने के लिए.. #ArnabGoswami जी को रिहा करने मांग के लिए हुतात्मा चौक से पैदल जाएंगे मंत्रालय और महाराष्ट्र के गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी से मिलेंगे #EmergencyInMaharashtra #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia pic.twitter.com/OZxA2XaCKd
— Ram Kadam (@ramkadam) November 10, 2020
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- काँग्रेसच्या जागा वाढतील माणिकराव ठाकरेंना भाबडी आशा…
- #Bihar : महागठबंधन-एनडीएमध्ये कांटे की टक्कर; चिराग पासवान ठरणार किंगमेकर ?
- #बिहार निवडणूक : नरेंद्र मोदींची लाटही राहिली नाही आणि करिश्माही राहिलेला नाही : भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
