Share

उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे

Published On: 

🕒 1 min read

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचा जलवा कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

यूपीतील पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे.उन्नाव बांगरमऊमध्ये भाजप आघाडीवर आहे. देवरिया, बुलंदशहर, फिरोजाबादमधील टूंडलामध्ये भाजप आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, सात जागांसाठी 88 उमेदवार मैदानात आहे. पोटनिवडणुकीसाठी 53 टक्के मतदान झाले होते.

उत्तर प्रदेशमध्ये 7 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. या सुरुवातींच्या कलानुसार 7 पैकी 4 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. सपा 1, बीएसपी 1, अपक्ष 1 एका जागेवर आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!