पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. पण यात भाजपपेक्षा जास्त जागा लढलेल्या जेडीयूला अपेक्षित कामगिरी करता आल्याचं दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला जर जेडीयूला कमी जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२१ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे तर महागठबंधन आघाडी १०८ जागांवर आघाडी घेतली आहे. जेदियुला ४९ तर भाजपला ७१ जागांवर आघाडी मिळाली आहे. आरजेडी ७२ तर कॉंग्निरेस २१ जागांवर आघाडीवर आहे. लोजपा ०७ तर इतर २३ जागांवर आघाडीवर आहेत.
दरम्यान, नीतीशकुमार हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा जरी भाजपने केली असती तरीही नितीशकुमार यांच्या पक्षा पेक्षा भाजपने अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चिराग यांनी या आगोदर भाजपशी आपले वैर नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे भाजपा पाठींबा देण्याची वेळ आली तर पासवान पाठींबा देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र भाजपने या आधी नितीशकुमार हेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे आमचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते आता सत्ता स्थापन करताना भाजप आपला शब्द पळणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे
- बिहारचा रणसंग्राम : महागठबंधन-एनडीएने जोरदार चुरस
- बिहार विधानसभा निवडणुकीत NDAने केली शंभरी पार
- #Bihar : महागठबंधन-एनडीएमध्ये कांटे की टक्कर; चिराग पासवान ठरणार किंगमेकर ?
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

