🕒 1 min read
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. पण यात भाजपपेक्षा जास्त जागा लढलेल्या जेडीयूला अपेक्षित कामगिरी करता आल्याचं दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला जर जेडीयूला कमी जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२७ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे तर महागठबंधन आघाडी १०० जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये कॉंग्रेस केवळ २१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या कॉंग्रेसच्या कामगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या या कामगिरीवर जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सुरुवातीचा टप्पा आहे. काँग्रेसच्या जागा वाढतील. महागठबंधन मागे राहणार नाही. तेजस्वी यादव नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. निकाल काय येतील याची वाट पाहिली पाहिजे, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- बिहार विधानसभा निवडणुकीत NDAने केली शंभरी पार
- #Bihar : महागठबंधन-एनडीएमध्ये कांटे की टक्कर; चिराग पासवान ठरणार किंगमेकर ?
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
