मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजाकडे येताना केली आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.
दरम्यान,अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. अर्णबची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी आता राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राम कदम यांनी ट्विट करत आपण आज ( ९ नोव्हेंबर ) रोजी सकाळी ११ वाजता अर्नब गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचं सांगितल आहे. तर ज्याच्यात हिम्मत आहे त्याने अडवून दाखवावे अस सरळ आव्हान देखील कदम यांनी दिले आहे. १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपण अर्नबला भेटायला जाणार असल्याचे राम कदम म्हणाले आहेत.
मैं कल तलोज़ा जेल सुबह 11 am #ArnabGoswamy जी को मिलने जाऊँगा . किसकी हिम्मत है तो रोक कर दिखाए . मैं 130 करोड़ देशवासीयों का नुमाइंदा के रुप में वहाँ जाऊँगा . @AnilDeshmukhNCP @OfficeofUT ——#EmergencyInMaharashtra
— Ram Kadam (@ramkadam) November 8, 2020
दरम्यान, यापूर्वी देखील राम कदम यांनी ट्विट करत सरकारला इशारा दिला होता. महाराष्ट्र सरकारने हे लक्षात ठेवावे की अर्णबच्या केसाला जरी धक्का लागला तरी या देशातील जनता ते सहन करणार नाही.दुर्योधनाचा अहंकार देखील टिकू शकला नाही हे विसरू नका. लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं कदम यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकार कान खोलकर सुन ले यदी #ArnabGoswami के सर के बालको भी धक्का लगा . तो अब यह देश की जनता बर्दाश्त नहीं करेगी अरे दुर्योधनका भी अहंकार नहीं टिका यह भूल मत जाना . बहोत जल्द तुम्हें इसकी क़ीमत चुकानी होगी #ArnabWeAreWithYou #EmergencyInMaharashtra #ArnabLifeIsInDanger
— Ram Kadam (@ramkadam) November 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, बेफिकीरीने वागू नका – उद्धव ठाकरे
- कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – उद्धव ठाकरे
- आनंदाची बातमी : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत
- सनरायजर्स हैदराबादावर विजय मिळवत दिल्ली थेट फायनलमध्ये
- साधा प्रवक्ता बनवला असता तरी भाजपला मान वर काढू दिली नसती; शिवसेना नेत्याने व्यक्त केली खदखद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

