Share

काँग्रेस पक्षाला झालंय तरी काय, राम कदमांची नाना पटोलेंवर सडकून टीका

Published On: 

मुंबई : युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.

आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

काल गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेत्यांसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आजही नाना पटोले याच मुद्द्यावरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर बरसले आहेत. अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

‘अमिताभ आणि अक्षय मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ट्वीटरच्या माध्यमातून टीव टीव करायचे. इंधन दरवाढीवर टीका करायचे.आज ते का गप्प आहेत? केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाविरुद्ध त्यांनीही भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ’, अशी तंबी नाना पाटोले यांनी दिलीय.

यावर भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय? असे असले तरी देशाचे बाजूने जो कोणी बोलेल, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे,’ असे राम कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!