Share

‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती. त्यांनतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे.

ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधलेल्या स्कोडा व्हिजन इन कन्सेप्ट कारला अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. दरम्यान, ही कार 18 मार्चला लाँच केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे.

संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

त्याच बरोबर नाविन संकल्पना वापरत कंपनीने कुशकच्या नावात ‘Q’ चा वापर केला आहे. कंपनीने ‘Kushaq’ असं स्पेलिंग लिहिलं आहे. यामागे कंपनीचा एक वेगळा विचार आहे. स्कोडा ऑटोच्या अन्य अनेक गाड्यांचं स्पेलिंग ‘K’ पासून सुरु होतं आणि शेवटी ‘Q’ असतो, (उदा. KODIAQ, KAROQ आणि KAMIQ). कुशकही याच रेंजमधील कार आहे, त्यामुळे कुशकच्या स्पेलिंगमध्ये कंपनीने शेवटच्या ‘K’ ऐवजी ‘Q’ लिहिला आहे.

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये माय स्कोडा कनेक्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!